अश्लील हावभाव करीत महिलेला मारला प्रपोज
याप्रकरणी संबंधित 60 वर्षीय अशोक चुनचुने या ज्येष्ठ नागरिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 51 वर्षीय शेजारी राहणाऱ्या महिलेनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेला संशयित आरोपी हा 60 वर्षांचा असून त्याला दारूचे व्यसन आहे. येरवड्यात असलेल्या जामा मशिदीजवळ पीडित महिलेच्या घरी तो भाड्याने राहायला आहे.
फिल्मी अंदाजात 51 वर्षीय महिलेला तू खूप सुंदर दिसते, मला खूप आवडतेस. आपण दोघे फिरायला जाऊ म्हणत तिला प्रपोज केले. फिर्यादी महिलेकडे बघून पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा हो. हे गाणे म्हणत महिलेला छेडले तसेच त्याने अश्लील हावभाव करून आपण मज्जा करू म्हणत महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच, तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करीत अश्लील गाणी म्हणत तिला त्रास दिला. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.