Uncategorized

कान्हापुरी येथे जपली जातेय सामाजिक बांधिलकी

करकंब/प्रतिनिधी,

कान्हापुरी येथे भैरवनाथ प्रतिष्ठान कान्हापुरी व ग्रामपंचायत कान्हापुरी यांच्या वतीने गावातील 200 गोर गरीब कुटुंबांना किराणा मालाचे किट चे वाटप करण्यात आले या किटच्या उद्घाटन प्रसंगी पंढरपूर तालुका पंचायत समिती गटविकास अधिकारी रविकिरण घोडके , पंचायत समिती सभापती संजय हरगर करकंब पोलीस स्टेशनचे पी.एस.आय अजित मोरे, निर्मलाताई ठोकळ प्रशालेचे प्राचार्य दत्तात्रय गाजरे सर, उद्योगपती संजय वाघमारे, प्राचार्य हरिदास रणदिवे सर, यांच्या हस्ते या किट चे वाटप करण्यात आले रविकिरण घोडके साहेब यांनी गावातील कोरोना रुग्णांची संख्या गत महिन्यात अधिक होती परंतु आपण अधिक आटोक्यात आणल्याने गावाचे अभिनंदन केले व कान्हापुरी गावासाठी भविष्यात जास्तीत जास्त योजनेचा लाभ देऊ असे आश्वासन दिले. याप्रसंगी गावातील दोनशे कुटुंबांना किट वाटप करण्यात आले शासनाने वाढवलेल्या लोक डाऊन मुळे गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली यामध्ये किराणा मालाचे किट वाटप उपक्रम अतिशय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी सरपंच प्रेम भैया चव्हाण, उपसरपंच राजेंद्र शिंदे, ग्रामपंचायत सदस्य दीपक फराडे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य लहू मुडपणे, गिरजा पाटील, डॉक्टर अनिल शिंदे, जीवराज मोरे, बाळासाहेब पवार, ग्रामपंचायत सदस्य दयानंद शिंदे ,युवा नेते आप्पासाहेब कचरे, चेअरमन भगवान फराडे, ग्रामपंचायत सदस्य महबूब देशमुख,असिफ

देशमुख ,रघुनाथ गाजरे, मुजम्मिल देशमुख, रामचंद्र कांबळे, उत्तम शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले

चौकट–गावामध्ये तीनवेळा जंतुनाशक फवारणी करून आर्सेनिक अलबम गोळ्यांचे वाटप वेळोवेळी रॅपिड टेस्ट कॅम्प आयोजित करून रुग्णसंख्या आटोक्यात आणली व कान्हापुरी गाव कोरोना मुक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *