Uncategorized

पुढील चार दिवसात धाराशिव कारखान्यात प्रतिदिन 16 ते 20 टन ऑक्सिजन निर्मितीस प्रारंभ 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार वसंतदादा इन्स्टिट्यूटने 23 एप्रिलला झूम मिटींगद्वारे राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची मिटींग घेण्यात आली. त्यामध्ये धाराशिव शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील सहभागी झाले होते. या बैठकीत धाराशिव कारखान्यात हा प्रकल्प सुरू करण्याची तयारी पाटील यांनी दाखवीत प्रकल्प उभारणीचे काम हाती घेतले होते. त्यांनी ते काम युद्धपातळीवर सुरू केले होते. ते काम आता पूर्णत्वास आले आहे. मशिनरींची प्राथमिक तपासणी झाली असून सिलेंडर उच्च दाबाने भरण्याची यंत्रणा बसविणे फक्त बाकी आहे. त्यापूर्वी निर्मिती होणाऱ्या ऑक्सिजनची वैद्यकीय दृष्ट्या गुणवत्ता तपासली जाणार आहे.आगामी चार दिवसात ऑक्सिजन गुणवत्ता चाचणी आणि तपासणी झाल्यावर ऑक्सिजन सिलेंडर निर्मितीला सुरुवात होणार असल्याची माहिती धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली.

धाराशिव साखर कारखाना प्रतिदिन 16 ते 20 टन ऑक्सिजन निर्मिती करणार

अतिरिक्त सामग्रीत ‘मॉलेक्युलर सिव्ह’ वापरून हावेतील वायुद्वारे ऑक्सिजनची निर्मीती मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. धाराशिव साखर कारखाना प्रतिदिन 16 ते 20 टन ऑक्सिजन निर्मिती होणार आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीचे आवाहन केल्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑक्सिजन निर्मिती करण्याबाबत व्हीसी मिटींग द्वारे आवाहन केले होते आणि अभिजित पाटील यांनी धाराशिव साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर तातडीने ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रकल्प उभारण्याची तयारी दाखविली होती.अवघ्या आठ ते दहा दिवसात हा प्रकल्प आता पूर्णत्वास येत असून चेअरमन अभिजित पाटील यांच्या या सुपरफास्ट कामगिरीची राज्यातील साखर कारखानदारात मोठी चर्चा आहे.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *