

पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील महादेव विठोबा हाके वय-75वर्षे हे शेतकरी दिः-15/03/2022रोजी सकाळी 11/00वा.चे सुमारास खर्डी गावातील बालाजी यांच्या दुकानामध्ये दाडी करून माझे घरी जात असताना वाटेत सिध्दार्थ पेट्रोलपंप खर्डी नजीक पाठीमागून एका मोटारसायकलवर आलेल्या दोन इसमांनी ओ मामा मास्क घाला,मास्क का घातला नाही आम्ही पोलीस आहोत तुम्हाला 200/-रूपय दंड भरावा लागेल.असे म्हणत आपल्या भागात चो-या खुप होत आहेत.तुम्ही कानातील कुंडल्या काढून खिशात घेवून जावा असे सांगितले. यावेळी फिर्यादीने मी घरी गेल्यावर काढून ठेवतो असे म्हणालेवर त्यानंतर अजून अनोळखी इसम दुसया मोटारसायकलवर आमच्याजवळ आला व फिर्यादीस ,थांबा मी काढतो तुम्ही खिशात घेवून घरी जावा.असे म्हणालेवर फिर्यादीने त्यांना कानातील कुंडल्या काढून देण्यास सांगितल्या त्यांनी कुंडल्या काढल्यानंतर कागदाच्या पुढीमध्ये घालून मला खिशात ठेवण्यास सांगितल्या. घरी गेल्यानंतर दुपारी 01/00वा.चे सुमारास मी ती पुढी उघडी करून पाहिली असता त्यामध्ये एक बारीक दगड दिसला.
या प्रकरणी महादेव विठोबा हाके वय-75 यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.