

जिल्हाधिकारी सोलापूर तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज पंढरपूर नगर पालिकेचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर केला असून या प्रभाग रचने बाबत १७ मार्च २०२० पर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत.
पंढरपूर नगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १ च्या सीमारेषा खालील नकाशात लाल रंगात दर्शविल्या असून या प्रभागाची एकूण लोकसंख्या ५ हजार ७३ असून या मध्ये अनुसूचीत जातीच्या रहिवाशांची संख्या २३१ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ८२ इतकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.नगर पालिका पाणी पुरवठा जॅकवेल पासून ते शीतल शहा हॉस्पिटल परिसर ते जुनी कुंभार गल्ली ते कैकाडी महाराज मठ परिसर ते भगवती नगर,अनिल नगरचा काही भाग अशी या प्रभागाची संकल्पित रचना आहे.