Uncategorized

“कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ रांगोळी व पाककला पदार्थ प्रदर्शन”

बुधवार,दि.०८.०३.२०२२ रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचालित कर्मयोगी विद्यानिकेत प्रशालेत जागतिक महिला दिनानिमित्त रांगोळी आणि पाककला पदार्थ प्रदर्शन घेण्यात आले होते. या कार्यक्रमात महिला पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.

कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाला म्हणजे शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यामध्ये संस्कृती, परंपरा, रूढी जपण्याचे आणि संस्कार घडविण्याचे उत्तम दालन असून त्याचेच उत्तम जिवंत उदाहरण म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त प्रशालेमध्ये खास महिला पालकांसाठी ‘चव महाराष्ट्राची’ या विषयावर घरून पदार्थ बनवून आणून त्याचे प्रदर्शन करणे तसेच डेकोरेशन करणे व नारी शक्ती या विषयावर पोस्टर रांगोळी यावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेमध्ये महिला पालकांनी हिरीरीने सहभाग नोंदविला त्यात नातवाच्या हट्टापायी सहभाग नोंदविलेल्या आज्जी स्पर्धेच्या विशेष मानकरी ठरल्या.रांगोळी स्पर्धेकरिता सौ.अदिती देशमुख यांनी उत्तम प्रकारे पर्यवेक्षकाची भूमिका निभावली, तर पाककला पदार्थ स्पर्धेसाठी सौ.सीमा सरदेशमुख, नगरसेविका सौ.सुप्रिया डांगे तसेच शिशु विहारच्या मुख्याध्यापिका सौ.आदिती देशमुख यांनी अतिशय उत्तम अशा पर्यवेक्षकांच्या भूमिका निभावल्या.

कार्याक्रमचे वेळी प्रशालेच्या प्राचार्य सौ.सोनाली पवार, श्री गणेश वाळके शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *