Uncategorized

अपेक्स केअर हॉस्पिटलच्या महिला कर्मचाऱ्याच्या घराची झडती तर अँब्युलंस चालकास अटक 

पंढरपुरातील कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेच्या मृतदेहाची अडवणूक करणाऱ्या हॉस्पिटल चालका विरोधात पंढरपुर शहरातील कुटूंबियांनी केलेल्या तक्रारीनंतर मिरजेतील अपेक्स केअर अनेक कारनाम्याची माहिती उघड होत गेली.या हॉस्पिटलमध्ये कोरोना ग्रस्त   87 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी डॉ महेश जाधव, त्याचा भाऊ डॉ. मदन जाधव, अकाऊण्टंट निशा पाटील यांच्यासह 10 जणांना पोलिसांनी अटक केली होती.या अटकेनंतर या हॉस्पिटलमधील आणखी कारनामे उघड होऊ लागले असून पोलिसांनीही पाळेमुळे खणून काढत अनेक बाबीचा सखोल तपास सुरु केला असल्याने नागिरकांमधून समाधान व्यक्त होत आहे.    
   या हॉस्पिटलचा चालक  डॉ महेश जाधव हा कोरोना बाधित रुग्ण आपल्याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात यावेत यासाठी अम्बुलंस चालकांनाही कमिशन देत असल्याचे उघड झाले आहे. एका रुग्णामागे चालकांना  7 हजार रुपये कमिशन देण्यात येत होते हि बाब तपासात निष्पन्न झाली आहे.अशा प्रकारे कमिशन खालेल्या तीन रुग्णवाहिका चालकास गांधी चौकी पोलिसांनी अटक केल्याने या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 13 झाली आहे.    
पंढरपूर शहरातील एका वृद्ध महिलेच्या मृत्यू नंतर सदर रुग्णाच्या नातेवाईकानी या हॉस्पिटलमध्ये करण्यात येत असलेल्या उपचाराबाबत जाब विचारला असता मयताच्या नातवास दमदाटी करण्यात आली होती.सदर नातेवाईकांनी या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निर्दर्शनास हि बाब आणून दिल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी थेट सांगली जिल्हाधीकारी कार्यालयात धाव घेत या हॉस्पिटल चालकाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. पुढे  अपेक्स रुग्णालयात उपचारादरम्यान मयत झालेल्या रुग्णांचे नातेवाईकही पुढे येत गेले. डॉ महेश जाधव याच्याविरोधात आतापर्यंत 16-17 नातेवाईकांनी तक्रारी दिल्या आहेत. तर पोलीस कोठडीत असलेल्या अकाऊण्टंट निशा पाटील हिच्या घराचीही काल पोलिसांनी झडती घेतली. हस्ताक्षराबाबत पुरावे जमा करण्यासाठी ही झडती घेतल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *