पंढरपूर ः 03- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री भगिरथ भारत भालके यांच्या प्रचारानिमित्त पंढरपूर येथील भालके यांच्या निवासस्थानी पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय, शिवसेना व आघाडीतील घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांची राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.श्री जयंतराव पाटील यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
याप्रसंगी बोलतांना ना.श्री जयंतराव पाटील साहेब म्हणाले की, या मतदार संघातील स्व.भारतनाना भालके यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणुक लागली असून या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी आलो आहे. या मतदार संघाने स्व.भारतनाना भालके यांना सलग तीन वेळा वेगवेगळ्या पक्षातून निवडून आलेले होते. या स्वाभिमानी जनतेने स्व.भारतनाना भालके यांचेवर जो विश्वास दाखविला आहे तोच विश्वास श्री भगिरथ भालके यांच्यावर दाखवावा. स्व.भारतनाना भालके यांनी संपूर्ण मतदार संघात केलेली विकास कामे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे.
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री दत्तात्रय भरणे साहेब म्हणाले की, ग्रामीण भागातील तरूण कार्यकर्त्यांनी गाफिल न राहता स्व.भारतनाना भालके यांनी केलेली विकास कामांची माहिती वाड्या-वस्त्यांवर पोहचवून स्व.भारतनाना भालके यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री भगिरथ भालके यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे काम करावे असे आवाहन केले.
यावेळी सर्वश्री दिपकआबा साळुंखे-पाटील, शिवाजीराव सावंत सर, साईनाथभाऊ अभंगराव, संभाजी शिंदे, युवराज पाटील, दिपक पवार, सुहास भाळवणकर तसेच राजश्री लोळगे यांनी आपले मनोगत व्यक्त करून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री भगिरथ भालके यांना निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.
सदरवेळी सर्वश्री आ.संजयमामा शिंदे तसेच पक्ष निरीक्षक सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, उत्तमराव जानकर, विजयसिंह देशमुख, सुधीर भोसले, संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे, अनिता नागणे, साधना राऊत, सुनिल डोंबे यांचेसह नगरसेवक, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
