Uncategorized

केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल दर कमी करणार नाही:

सद्य:स्थितीत केंद्र सरकारकडे उत्पन्नाचे कोणतेच साधन नाही. केवळ पेट्रोल व डिझेल हेच केंद्र सरकारच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. देशाची हलाखीची आर्थिक परिस्थिती पाहता केंद्र सरकार पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्याची शक्यता नाही, असा दावा काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापुरात केला.केंद्राने पेट्रोलवरील कर कमी केल्यास राज्य सरकारही त्यावरील कर कमी करेल. त्यामुळे पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात. मात्र, सध्या पेट्रोलचे कर हेच केंद्राच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत झाले आहे. त्यावरच सध्या पगारापासून ते विकासकामापर्यंत सर्वकाही खर्च भागवला जात आहे. यामुळे सध्याची भारताची हलाखीची आर्थिक परिस्थिती पाहता पेट्रोलचे कर कमी करतील, अशी शक्यता वाटत नाही. लसीकरणाच्या इव्हेंटवरूनही चव्हाण यांनी केंद्रावर निशाणा साधला. लसीकरण हा इव्हेंट कधी नाही, ती प्रक्रिया आहे. केंद्राची ती जबाबदारी आहे आणि नागरिकांचा तो हक्क आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यात जाहिरातबाजी कशासाठी केली जात आहे?’ असा सवालही त्यांनी केला आहे. १०० कोटी लोकांना लस दिल्याची सध्या जाहिरातबाजी सुरू आहे.देशभरामध्ये केवळ ३० टक्केच लाेकांना लसीचे दोन्ही डोस
आजवर देशभरामध्ये फक्त ३० कोटी लोकांना लसीचे दोन्ही डोस दिलेले आहेत. हे प्रमाण देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ २१ टक्के आहे. जगाच्या तुलनेत लस देण्यात भारत १४४ व्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपण लसीकरणात किती मागे आहोत हे लक्षात येईल. तरीही लसीबाबत जी जाहिरातबाजी सुरू आहे ती चुकीची असल्याचे ते म्हणाले.स्वत:चा फोटाे छापणारे मोदी जगातील एकमेव पंतप्रधान
चव्हाण म्हणाले, प्रत्येक गोष्टीत इव्हेंट करण्याचा मोदी यांनी धडाकाच लावला आहे. त्यांच्या वाढदिवशी विक्रम करायचा म्हणून तत्पूर्वी चार दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले. वाढदिवशी जादा लसीकरण केले. मुळात ही लस केंद्राने स्वत: विकत घेणे आवश्यक होते. पण अनावश्यक स्पर्धा केल्यामुळे लसीचा दर वाढला. खासगी कंपन्यांना फायदा मिळावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा डाव केल्याचा आरोपही त्यांनी केला. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर स्वतःचा फोटो छापणारे मोदी हे जगातील एकमेव पंतप्रधान असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *