ताज्याघडामोडी

राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचे आक्षेप फेटाळले

भाजपच्या दोन आमदारांवर काँग्रेसकडून आक्षेप नोंदवण्यात आला होता. काँग्रेसच्या आक्षेपावर राज्य निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचे आक्षेप फेटाळले आहेत. दरम्यान, राज्यात झिडकारल्यावर काँग्रेसने केंद्रीय आयोगाकडे तक्रार केली आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. सर्वपक्षीय आमदारांनी विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. अशातच, काँग्रेसने भाजपच्या दोन आमदारांवर आक्षेप नोंदवला. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतावर काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे. या दोन्ही आमदारांऐवजी त्यांच्या समवेत सहकाऱ्यांनी मतपत्रिका बॉक्समध्ये टाकल्या, अशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाला केली. याप्रकरणी निवडणूक आयोगाने निकाल दिला असून, निवडणूक आयोगाने काँग्रेसचा आक्षेप फेटाळला आहे.

पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिकळ या कर्करोगाने त्रस्त आहेत. सोमवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत मुक्ता टिळक यांनी मतदान केले. मुक्ता टिळक यांना व्हिलचेअरवरून विधानभवनात नेण्यात आलं. आजारी असतानाही त्या मतदानासाठी हजर राहिल्या. तर, भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे देखील मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. मात्र, तरीही त्यांनीसुद्धा मुंबईत येऊन विधानपरिषदेसाठी मतदान केले आहे. त्यामुळे आजारपणापेक्षा पक्ष महत्त्वाचे हे आज लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी सिद्ध केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *