कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शुक्रवार दिनांक २८ जानेवारी २०२२ रोजी रोटरी क्लब पंढरपूर व सिंहगड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने “शाकाहार व व्यसनमुक्ती” याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान उत्साहात संपन्न झाले.
सिंहगड महाविद्यालयात आयोजित करण्यात करण्यात आलेल्या व्याख्यानाच्या सुरुवातीस व्याख्याते श्रीरंग बागल यांचे स्वागत रोटरी क्लब चे अध्यक्ष रो. किशोर निकाते यांच्या हस्ते करण्यात आले.
सिंहगड महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात बोलताना श्रीरंग बागल म्हणाले, मांसाहार हा माणसाचा आहार नाही. १९९२ साली अमेरिकेतील डाॅक्टर पुण्यात येऊन कुष्ठरोग रुग्णाचा सर्वे केला असता त्यातील ९५ टक्के कुष्ठरोगी रूग्ण हे मांसाहारी निघालेत. अलीकडेच्या काळात मांसाहार केल्याने अनेक रोगाला माणसाचे शरीर बळी पडत आहे. मांसाहार हे खाद्य हे ज्या प्राण्यांचे सुळे दात आहेत, जे प्राणी जिभेने पाणी पितात अशा प्राण्यांचा मांसाहार हे खाद्य आहे. मांसाहार करत असलेल्या माणसांमध्ये रोगाचे प्रमाण जास्त आहे. शाकाहारी करत असलेल्या माणसांना फार कमी रोगराई होत आहे. हे वास्तव लक्षात घेतले आहे. मांसाहार प्राण्याची संख्या भविष्यात जासत होईल हि भिती बाळगण्याची गरज नाही कारण सृष्टीचा नियम आहे. त्याप्रमाणे ते तसा बदल होत राहील. कोणत्याही प्रकारच्या मांसाहार क जीवनसत्व नाही. माणसाने शाकाहार सेवन केल्यास जगात विश्वशांती नांदेल अशा विश्वास त्यांनी यादरम्यान बोलताना व्यक्त केला. यादरम्यान दरम्यान उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना श्रीरंग बागल यांनी उत्तरे दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, रोटरी क्लब पंढरपूर येथील रो. मिलिंद वंजारी, रो. भारत ढोबळे, लक्ष्मीकांत कोटगिरी, रो. सचिन शिंदे आदींसह रोटरी क्लब पंढरपूरचे पदाधिकारी व सिंहगड महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
