Uncategorized

डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत फॅबटेक स्कूलचे उत्तुंग यश

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संचलित पुणे फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानात गोडी लावणे ,मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, विज्ञानात विशेष प्रतिभा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेणे, व त्यांना प्रोत्साहित करणे, यासाठी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा प्रशालेत ही स्पर्धा राबवित आहेत .मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशन ,मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत इयत्ता सहावी व नववी मधील फॅबटेक पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यशाची परंपरा कायम राखली .

नोव्हेंबर महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत इयत्ता सहावी मधील कुमार शौर्य सचिन लिगाडे, कुमार अजय शरद पवार ,कुमारी वैष्णवी दत्तात्रेय खरात, कुमार चैतन्य विकास भाले कुमारी अन्वी अश्विनी कांबळे यांनी ही परीक्षा पास केली असून कुमार शौर्य सचिन लिगाडे याची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली आहे. त्याच प्रमाणे इयत्ता नववी मधील कुमारी रिया अवधूत कुमठेकर, कुमारी सुप्रिया शरद पवार या दोघींनीही या परीक्षेत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांच्या यशामुळे फॅबटेक स्कूलच्या यशात एक मानाचा तुरा खोवला आहे . या गुणवंत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक प्राचार्य श्री. सिकंदर पाटील व प्रशालेचे शिक्षक श्री निसार इनामदार (स्पर्धा परीक्षा विभाग )यांचे फॅबटेक संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर, संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अमित रूपनर श्री. दिनेश रूपनर व कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक वर्गातून कौतुक व अभिनंदन होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *