Uncategorized

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

 

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

पंढरपूर :  माजी आमदार सुधाकर परिचारक (वय 84) यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. 

 त्यांच्या सोबत त्यांचे बंधू आणि प्रशांत परिचारक यांचे वडिलही पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यांना दोन दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. दक्षता म्हणून या परिचारक बंधूंना पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

  • माजी आमदार सुधाकर परिचारक आणि त्यांच्या बंधूंना दोन दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर त्यांची रॅपिड अँटिजेन चाचणी केली होती. त्यामध्ये हे दोन्ही परिचारक बंधू कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. त्यानंतर घरातील इतर लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *