Uncategorized

सरकोली पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी योजनेतील रकमेवर तत्कालीन डाकपालाचा डल्ला

सरकोली शाखा डाकघर येथील श्री महेशकुमार चंद्रकांत भोसले रा सरकोली ता पंढरपूर यांनी त्यांचे सुकन्या समृद्धी खाते पुस्तक क्रमांक पंढरपूर हेड पोस्ट ऑफिस येथील खिडकी वरती रक्कम जमा करण्याकरिता सादर केले असता सुकन्या समृद्धी खाते पुस्तक क्रमांक मधील शिल्लक आणि Finacle Software मधील शिल्लक यामध्ये तफावत आढळली. या पुस्तकामध्ये सरकोली शाखा डाकघर येथे दिनांक .. रोजी जमा केलेली रक्कम रु /- (रु दोन हजार फक्त) आणि .. रोजी जमा केलेली रक्कम रु. /- (रु चार हजार फक्त) सरकारी हिशोबात घेतली नाही.
सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधीक्षक डाकघर पंढरपूर विभाग पंढरपूर यांनी श्री एस पी काळे, तत्कालीन सहायक अधीक्षक मुख्यालय अतिरिक्त कार्यभार सहायक अधीक्षक पंढरपूर उत्तर उपविभाग पंढरपूर यांना पत्र क्रमांक F2/Non Credit/Sarkoli BO/16 dated 27.10.2016 अन्वये या प्रकरणी ताबडतोब सरकोली शाखा डाकघर येथे भेट देऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार श्री एस पी काळे, तत्कालीन सहायक अधीक्षक मुख्यालय अतिरिक्त कार्यभार सहायक अधीक्षक पंढरपूर उत्तर उपविभाग पंढरपूर यांनी सरकोली शाखा डाकघर व पंढरपूर प्रधान डाकघर येथे भेट देऊन सखोल चौकशी केली असता असे निदर्शनास आले किसलीम अमीर मुलाणी, तत्कालीन शाखा डाकपाल सरकोली पंढरपूर प्रधान डाकघर यांनी खालील नमूद केल्याप्रमाणे लोकांचे सुकन्या समृद्धी खात्यात जमा करण्याकरीता त्या त्या खातेदारांकडून रोख रक्कम पासबुकासाहित वेळोवेळी स्वीकारली.
त्यानंतर त्यांनी सदर खात्यांच्या पासबुकात सदर व्यवहारांच्या नोंदी स्वहस्ताक्षरात करून शिल्लक रक्कम लिहून सरकोली शाखाडाकघराचे तारीख छाप मारले व स्वाक्षरी केली.परंतु सदर व्यवहारांच्या नोंदी त्यांनी शाखाडाकघर मध्ये असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेच्या जर्नल मध्ये किंवा शाखाकार्यालय हिशेब पुस्तिकेत केल्या नाही व स्वीकारलेली रोख रक्कम रुपये /-( रुपये पंचवीस हजार फक्त) सरकार जमा न करता स्वतःच्या खाजगी कामासाठी वापरून सदर रकमेचा अपहार केला आहे. 
      सलीम अमीर मुलाणी, तत्कालीन शाखा डाकपाल सरकोली पंढरपूर प्रधान डाकघर यांनी डाक विभागाची व खातेदारांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यांचे विरुद्ध झाले चौकशीचे कागदपत्र सत्य प्रतीसोबत जोडत राजकुमार बळीराम घायाळ सहायक अधीक्षक डाकघर पंढरपूर यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *