Uncategorized

आई वडिलांना पगाराचे पैसे दिले म्हणून पत्नीची पतीला बेदम मारहाण

आई वडिलांना पगाराचे पैसे का दिले? असा जाब विचारत पत्नीने बेदम मारहाण केल्यानंतर पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पतीनं आत्महत्या केल्याची घटना आष्टी येथे घडली आहे.अनिल आबासाहेब जगताप असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून ते वनरक्षक पदावर कार्यरत होते. अलीकडेच त्याचा विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच पत्नीनं पतीला त्रास द्यायला सुरुवात केली होती.विशेष म्हणजे पत्नीनं लग्नापूर्वीचा पगार काय केला? याचा हिशोब दे म्हणून पतीकडे तगादा लावला होता. शिवाय पगाराचे पैसे आई वडिलांकडे का दिले म्हणून पतीला मारहाणही केली होती.

             आरोपी पत्नी एवढ्यावरच थांबली नाही, तर शेतजमीन नावावर करून देण्यासाठी पतीचा छळ सुरू केला होता. पत्नीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून पतीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या केल्याच्या घटनेला एक महिना उलटून गेल्यानंतर पत्नीसह चौघांवर आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून या घटनेचा तपास सुरू आहे.

 

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *