Uncategorized

पंढरपूर सिंहगड मध्ये “उद्योजकता विकास” याविषयावर ऑनलाईन वेबिनार संपन्न

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील येथील एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी “उद्योगता विकास” या विषयावर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले होते. हे वेबिनार आयआयसी व ईडीसी सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते हा वेबिनार मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासनाकडून घालुन दिलेले निर्बंध लक्षात घेऊन पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या उद्योजक विकासासाठी ऑनलाइन “उद्योजकता विकास” याविषयावर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले होते या वेबिनरच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी नागेश कोरके यांचे स्वागत केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी ऑनलाइन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. याशिवाय मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, प्रा. विजय चव्हाण आदींनी ही ऑनलाईन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना नागेश कोकरे म्हणाले व्यवसाय मध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत असून या तंत्रज्ञानाचे संपूर्ण ज्ञान व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीस असणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक माहितीच्या आधारे नवनवीन उद्योग क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या व्यवसायाशी निगडित अशी माहिती संकलन करून त्यावर अभ्यास करून पुढील वाटचाल करणे अपेक्षित आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात जगाला व समाजाला आवश्यक असलेल्या वस्तूंची निर्मिती करणे आवश्यक आहे. असे मत उद्योजक नागेश कोकरे यांनी सिंहगड महाविद्यालयात ऑनलाईन आयोजित केलेल्या वेबिनार मध्ये बोलताना व्यक्त केले. हे वेबिनार यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. प्रदीप व्यवहारे, गणेश बिराजदार, विक्रम भाकरे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बाळासाहेब गंधारे यांनी केले तर आभार प्रा. राहुल शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *