Uncategorized

धाराशिव साखर कारखान्याच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीव्दारे उदघाटन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस तोंड देताना महाराष्ट्रात ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्याने राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी असे आवाहन केले होते.या आवाहनानंतर धाराशिव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी तातडीने पावले उचलीत राज्यातील पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आणि केवळ १२ दिवसात याचे काम पूर्ण झाले.या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या ऑक्सिजनच्या शुद्धतेवर अन्न व औषध विभागाने शिक्का मोर्तब केल्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे या प्रकल्पाचे उदघाटन केले असून यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जलसंपदामंत्री जयंत पाटील, धाराशिवचे पालकमंत्री शंकरराव गडाख-पाटील व्हीसीव्दारे सहभागी झाले. यावेळी खासदार ओमराजे निबांळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार कैलास पाटील, कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील हेही व्हीसी व्हीसी द्वारे सहभागी झाले होते.
             यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि,राज्यात सध्या दुसऱ्या लाटेचे आव्हान मोठे आव्हान आहे.राज्याला १७०० मेट्रिक टन ऑक्सिजची गरज आहे. आणि हि गरज पूर्ण करण्यासाठी  आपण अनेक ऑक्सिजन निर्मित प्रकल्पाना चालना दिली आहे.
           यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी धाराशिव साखर कारखान्याने तातडीने उभारलेल्या या प्रकल्पाबाबत चेअरमन अभिजित पाटील यांचे अभिनंदन करीत ५० पेक्षा जास्त बेडच्या हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणे अनिवार्य करण्याची गरज प्रतिपादन केली.तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकल्पाच्या उभारणीबाबत अभिजीत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.जलसंपदामंत्री जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री शंकरराव गडाख यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रास्ताविक केले 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *