

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांसाठी वेदिक मॅथ्स चे वेबिनार आयोजित केले होते अनअकॅडमी तर्फे इयत्ता पहिली ते अकरावी च्या विद्यार्थ्यांसाठी बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार ही गणिते सोडविण्यासाठी वैदिक गणिताच्या सोप्या टीप्स सांगितल्या. वेद नावाच्या प्राचीन भारतीय शिकवणीवर आधारित तर्क आणि गणितीय कार्य करणारी प्रणाली म्हणजेच वैदिक गणित होय. कार्यक्षम व शिकण्याची सोपी पद्धत म्हणजे वैदिक गणित होय विद्यार्थ्यांमध्ये नेहमी अभ्यासक्रमात शर्यत असते . क्षमता असलेले लोकच शर्यत जिंकण्यात सक्षम असतात या वेबिनारमध्ये गणिताविषयी चा दृष्टिकोन बदलून टाकण्यासाठी, बीजगणितातील प्रश्नांची उत्तर चुटकीसरशी देण्यासाठी तसेच वैदिक गणिताच्या अभ्यासाने मेंदू सक्षम बनणे इत्यादी अनेक फायदे वैदिक मॅथ्सच्या माध्यमातून प्रशालेतील विद्यार्थ्यांना अनअकॅडमीच्या समर्पित कौर यांनी सांगितले. हे वेबिनार दोन सत्रांमध्ये आयोजित केले होते .यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन वेदिक मॅथ्स टिप्स सांगितल्या विद्यार्थ्यांनाही आॅनलाइन गणिते सोडवले या वेबिनारचे आयोजन प्राचार्य सिकंदर पाटील यांनी केले होते .हे वेबिनार यशस्वी होण्यासाठी कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांचे मार्गदर्शन मिळाले.