ताज्याघडामोडी

भोसे येथे महाविद्यालयीन तरुणाची आत्महत्या

 

भोसे येथील महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेला तरुण रोहित विलास आडगळे वय वर्षे ,१९ याचा आईसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता.रागाच्या भरात त्याने राहत्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे भोसे गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

रोहित आडगळे हा  महाविद्यालयांमध्ये  बीएससीच्या तिसऱ्या वर्षांमध्ये शिकत होता. एक हुशार विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती.आई सोबत रोहितचा किरकोळ कारणावरून वाद झाला आणि आणि यातूनच त्याने  दुपारी 1.वाजण्याच्या सुमारास घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *