सहकारमंत्री म्हणून काम करताना मी एकही कारखाना विकण्याचा आदेश दिलेला नाही. त्या वेळी जे कारखाने विकले गेले, ते कोणाच्या आदेशाने विकले, त्याचे मूल्य कोणी ठरवले, त्या आदेशावर कोणाची सही होती? या गोष्टी तपासून त्यावर बोलणे योग्य ठरेल, असे प्रत्युत्तर माजी सहकारमंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. कारखाने विकण्याचा निर्णय ज्या बँकेचे कर्ज आहे, तीच बँक घेते, असेही ते म्हणाले.भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप सुरूच ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी विक्री झालेल्या, भाडेतत्त्वावर दिलेल्या ६५ साखर कारखान्यांची यादी नुकतीच जाहीर केली. त्यावर पाटील यांनी उत्तर दिले. आता या मुद्द्यावरूनही राजकारण होण्याची शक्यता आहे.मला यादी द्या, मी अभ्यास करून उत्तर देईन
पाटील म्हणाले, “कोणी कसली यादी जाहीर केली ते मला माहिती नाही. ती यादी त्यांनी मला द्यावी, मी अभ्यास करून सविस्तर उत्तर देईन. मात्र, ती यादी सहीसह असावी, कोणतीही यादी चालणार नाही.’
