Uncategorized

पंढरपुरात ३ ‘एजंट’ सापडले !

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा शहर तालुक्यातील सुरु असलेल्या मटका,जुगार,वाळू चोरी,बेकायदा दारू विक्री आदींबाबत थेट विधानसभेत आवाज उठवला,या प्रकरणी मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या चौकशीची मागणी केली.या बाबत बोलताना गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्याने विविध अवैध धंद्या बाबत दाखल केलेल्या केसेसची आकडेवारी सभागृहात सादर केली व सारे काही आलबेल असल्याचे सांगितले.परंतु विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट हक्क भंगाचा इशारा देताच मंगळवेढा dysp यांची सोलापूर sp यांच्या करवी चौकशी करू असे आश्वासन दिले.
       विधानसभेतील या घटनाक्रमाची जोरदार चर्चा पंढरपूर विधानसभा मतदार संघात झाली.परंतु आमदार आवताडे यांनी केवळ मंगळवेढा शहर तालुक्यातील अवैध धंद्याचाच प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्यानंतर पंढरपूर शहर तालुक्यात सारे अवैध धंदे बंद आहेत याची खात्री पटल्यानेच आमदार आवताडे यांनी पंढरपूरचा नामोल्लेख केला नसावा अशीही चर्चा होऊ लागली. 
 पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने ३ मटका एजन्ट वर कारवाई केल्याने पंढरपूर शहर तालुक्यात सगळे अवैध धंदे बंद आहेत,या आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केलेल्या अप्रत्यक्ष विश्वासास बळ मिळाले आहे.बहुतेक हे तिन्ही एजन्ट स्वतःच बुकी मालक असावेत अशीही चर्चा होऊ लागली आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *