ताज्याघडामोडी

स्वेरीत ‘नॅशनल स्पोर्ट्स डे’ संपन्न 

खेळामुळे शरीर व मन तंदुरुस्त राहते -हेड कोच श्रीपाद परदेशी

पंढरपूर-‘खेळात खेळाडूंनी कोणत्याही परिस्थितीत न घाबरता प्रचंड मेहनत घेतली पाहिजे व नियमित सरावावर भर दिला पाहिजे. सराव करणे हे आरोग्य व शरीराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. नियमितच्या सरावामुळे शरीराला खेळाची सवय होते आणि खेळामुळे शरीर व मन तंदुरुस्त राहते.’ असे प्रतिपादन बॅडमिंटन अकॅडमीचे हेड कोच श्रीपाद परदेशी यांनी केले. 

स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये ‘नॅशनल स्पोर्ट्स डे’ नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हेड कोच श्रीपाद परदेशी मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापुरातील संगमेश्वर कॉलेजच्या क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा.आनंद चव्हाण हे होते. दिप प्रज्वलनानंतर प्रास्तविकात स्वेरी डिप्लोमाचे क्रीडा समन्वयक प्रा.आकाश पवार यांनी ‘नॅशनल स्पोर्ट्स डे’चे महत्व पटवून जगप्रसिद्ध हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या खेळातील अनेक उदाहरणे दिली.

यावेळी कुस्तीपटू रोहन पवार यांनी मनोगत व्यक्त करून स्वेरीतील क्रीडा विभागाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात आनंद चव्हाण म्हणाले की, ‘व्यायामाचे आपल्या जीवनात खूप महत्त्व असून हे व्यायाम व प्राणायम आरोग्याचे संरक्षण करतात. यासाठी जर नियमित व्यायाम केला तर त्याचा शरीर व आरोग्यासाठी फायदा होतो. नियमित सरावामुळे भविष्यात खेळाडूंचा खेळ देखील सुधारतो. त्यामुळे खेळाडूंनी नेहमी सरावावर भर दिला पाहिजे.’ हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेतील विभागप्रमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अविनाश सपकाळ यांनी केले तर डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *