ताज्याघडामोडी

डिसेंबरमध्ये १२ दिवस बंद राहतील बँका; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी!

या वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर आठवडाभराच्या अंतरावर आहे. त्यामुळे तुम्ही देखील डिसेंबर महिन्यात बँकेशी संबंधित कामांचे नियोजन केले असेल तर त्याआधी आरबीआयने जारी केलेल्या सुट्ट्यांची यादी नक्की जाणून घेतली पाहिजे. आरबीआयच्या यादीनुसार डिसेंबर महिन्यात 16 दिवस बँका बंद राहणार आहेत.

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, डिसेंबरमध्ये बँका एकूण 16 दिवस बंद राहणार आहेत. यात 4 रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांचा देखील समावेश असेल. डिसेंबरमध्ये ख्रिसमस सण आहे. या काळात देशातील जवळपास सर्व बँकांना सुट्टी असते. तर काही सुट्ट्या स्थानिक असल्याने तेथील विशेष सणांच्या निमित्ताने बँका बंद राहतील.

डिसेंबर 2021 मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी

3 डिसेंबर – फेस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियर (पणजीत बँका बंद)
5 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
11 डिसेंबर – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
12 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
18 डिसेंबर – यू सो सो थामची पुण्यतिथी (शिलाँगमध्ये बँका बंद)
19 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
24 डिसेंबर – ख्रिसमस सण (आयझॉलमध्ये बँका बंद)
25 डिसेंबर – ख्रिसमस (बंगळुरू आणि भुवनेश्वर वगळता सर्व ठिकाणी बँका बंद) शनिवार, (महिन्याचा चौथा शनिवार)
26 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
27 डिसेंबर – ख्रिसमस सेलिब्रेशन (आयझॉलमध्ये बँका बंद)
30 डिसेंबर – यू कियांग नोंगबाह (शिलॉन्गमध्ये बँका बंद)
31 डिसेंबर – नवीन वर्षांची संध्याकाळ (आयझॉलमध्ये बँका बंद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *