ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्लेसमेंट मध्ये दबदबा वाढला

पंढरपूर: प्रतिनिधी 

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील तब्बल २५ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्लेसमेंट मधील दबदबा वाढला असुन चालु शैक्षणिक वर्षातील तब्बल २५ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून विप्रो कंपनीत निवड झाली आहे.

“विप्रो” टेक्नॉलॉजीज ही अझीम प्रेमजी यांच्या विप्रो कारपोरेशन या उद्योगसमुहातील सर्वात मोठी कंपनी आहे. २००७-०८ या आर्थिक वर्षात ४.३ अब्ज अमेरिकन डॉलर उत्पन्न, ९४००० कर्मचारी आणि जगभरातील ५३ विकसन केंद्रे असलेली विप्रो टेक्नोलॉजीज ही भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महसुलाद्वारे क्रमांक ३ ची कंपनी आहे.

अशा या नामांकित कंपनीत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील प्रज्ञा नगरे, अतिक पठाण, श्रेया भहादुले, काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील आरती येमूल, सौरभ वांगिकर, रामेश्वर चौवरे, आरती शेळके, साहिल जोशी, अनुजा मुळे, मैथली महाकोडे, सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील जोत्सना राऊत, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील उमा गायकवाड, अमीर शेख, सुरज राऊत, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील अजिंक्य कोळवले, अंकित पाठक, अभिषेक घोटगे, रोहन देशमुख, ओंमकार परदेशी, अनुरूद्ध जोशी, ॠत्विक बडवे, अमिन शेख, सुर्यकांत सोनटक्के, तेजस जयकर, ओंकारेश्वर अडवळकर आदी २५ विद्यार्थ्यांची पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयात ऑनलाईन आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन निवड करण्यात आली असुन कंपनीकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ३.५ लाख रूपये वार्षिक पॅकेज मिळणार आहे. या निवडीबद्दल पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. 

 “विप्रो” कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. चेतन पिसे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, प्रा. योगिनाथ कलशेट्टी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *