गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! बँकेच्या शिपायानेच चोरले ३ कोटीचे दागिने चोरले; तिघे अटकेत

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात असलेल्या आमळदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून ३ कोटी १७ लाख ७९ हजार ८५० रुपयांचे सोने सोमवारी रात्री चोरीस गेले. बँकेत शिपाई म्हणून कामावर असलेल्या एकाने गावातीलच दोन जणांना सोबत घेऊन ही चोरी केल्याचे अवघ्या तीन तासात पोलिसांनी उघडकीस आणत तिघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात.

संशयित राहुल अशोक पाटील (वय २४) हा महाराष्ट्र ग्रामीण बँकेतच शिपाई पदावर काम करतो. तर विजय नामदेव पाटील (वय ३९) व बबलु उर्फ विकास तुकाराम पाटील (वय ३७, रा. आमळदे, ता. भडगाव) त्याचे मित्र असून ते शेती करतात. बँकेत शेतकऱ्यांनी तारण ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असल्याची माहीती राहूल शिपाई असल्यामुळे त्याला होती. गेल्या आठवड्यात राहुल व त्याच्या य दोघा मित्रांनी चोरीचा प्लॅन तयार केला.

दोन दिवसांपूर्वी राहुलने बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. त्यामुळे कोणत्याही हालचाली चित्रीत होत नव्हत्या. यानंतर सोमवारी बँक बंद करतेवेळी त्याने तिजोरीला कुलूप लावलेले नव्हते. केवळ दरवाजा बंद केला. त्यानंतर बँक व्यवस्थापक तन्मय अजय देशपांडे (वय ३०, रा. मेहरुण शिवार, जळगाव) यांच्याकडे बँकेच्या चाव्या दिल्या नाहीत.

देशपांडेसह इतर दोन कर्मचारी घरी निघुन गेल्यानंतर रात्री १२ वाजेच्या सुमारास राहूल, विकास व विजय या तीघांनी चावीने कुलूप उघडून बँकेत प्रवेश केला. यानंतर तिजेरीत ठेवलेले दागिने काढुन घेत विजय व विकास यांच्या शेतात पुरले. डीव्हीआर मशीन काढून घेत जवळच असलेल्या एका विहीरीत फेकुन दिले. ठरल्यानुसार रात्री १ वाजता राहूलने गावातील पोलिस पाटील, प्रतिष्ठीत नागरीकांच्या घरी जाऊन बँकेत चोरी झाल्याची माहिती दिली.

भडगाव पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्यासह पथक बँकेत पोहोचले. तर चोरीस गेलेला ऐवज कोटीच्या घरात असल्यामुळे नियंत्रण कक्षास माहिती देण्यात आली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही पहाटे चार वाजता आमळद्यात पोहोचले. राहुल देत असलेल्या माहीतीमुळे पोलिसांना संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने संपुर्ण घटनाक्रम उलगडला. इतर दोघांचीही नावे सांगीतले.

रात्री १ वाजता झालेल्या या चोरीचा उलगडा अवघ्या तीन तासात पहाटे पाच वाजता झाला. यांनतर तीघांना अटक करुन शेतात पुरून ठेवलेले दागिने, विहीरीतील डीव्हीआर मशीन पोलिसांनी हस्तगत केल्या. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *