Uncategorized

लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत आज दुपारपर्यंत अधिसूचना निघेल

राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. अनेक जिल्ह्यात रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य साकारून काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. मात्र काल राज्यात झालेल्या अनलॉकच्या गोंधळामुळे सरकारला तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. यावरच आज पुन्हा एकदा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे.काही जिल्ह्यात परिस्थिती निवळत आहे. याचाच विचार करून आज मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव देण्यात आला असून दुपारपर्यंत अधिसूचना निघेल अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यातील १८ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटविण्यात आल्याच्या विजय वडेट्टीवार यांच्या घोषणेने गुरुवारी गोंधळ उडाला होता. यामुळे सारे निर्बंध शिथिल झाले, असे चित्र निर्माण झाले होते. पण असा कोणताही निर्णयच झाला नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिले.राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. त्यानंतर काही वेळातच नवी नियमावली अद्याप विचाराधीन आहे. राज्यात लॉकडाऊन सुरुच असेल, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलंय. यावरून विरोधी पक्ष भाजपने सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *