Uncategorized

आमदार बबनदादा शिंदे यांचा विशेष सहकार पुरस्काराने गौरव

माढा विधानसभा सलग ६ वेळा प्रतिनिधित्व करत असलेले आमदार बबनदादा शिंदे यांची कारकीर्द म्हणजे सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करताना सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी अथक परिश्रम घेतले कि कितीही राजकीय लाटा येवोत जनता साथ सोडत नाही याचेच उदाहरण होय.त्यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलराव शिंदे कारखान्याने साखर कारखानदारीत राज्य पातळीवरील नव्हे तर देश पातळीवरील अनेक उच्चांक कायम केले आहेत.राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील सहकार साखर कारखानदारीतील अनेक पुरस्कार पटकावले आहेत.जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या माढेश्वरी सहकारी बँकेचे हस्तांतरण आ.बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळाकडे हस्तांतरित करण्यात आले आणी आज माढेश्वरी बँकेचा मोठा शाखा विस्तार आणि ठेवीच्या प्रमाणात कैक पटीने वाढ झाल्याचे दिसून येते.एकीकडे राज्यातील,सोलापूर जिल्ह्यातील अनेक कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर असताना विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या माध्यमातून विजय शुगर हा कारखाना ताब्यात घेऊन आज विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना युनिट क्रमांक २ म्हणून हाही कारखाना जोमाने गळीत हंगाम पार पाडत असल्याचे दिसून येते.भीमा-सीन जोडकालव्यासाठी बोगद्याच्या कामासाठी निधी मिळावा,माढा तालुक्याचे पाण्याचे दुर्भिक्ष दूर व्हावे म्हणून युती सरकारच्या काळात मंत्रिपद नाकारून त्यांनी केलेली विकास कामे आज त्यांच्या नेतृवावर प्रत्येक निवणुकीत सामान्य जनतेला विजयावर शिक्का मोर्तब करण्यास भाग पाडत आली आहेत.   

आमदार बबनदादा शिंदे यांनी सहकार क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीची दखल घेत मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे नवभारत टाइम्स च्या वतीने त्यांच्या विशेष सहकार पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आ. शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

                          

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *