जगभारत थैमान घातलेल्या कोरोना विषाणूपासून संरक्षण होण्यासाठी सध्या जगभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. अशातच आता कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
कोरोना लसीमुळे तुमचे केवळ कोरोनापासूनच नाही तर त्याशिवायही इतर 21 आजारांपासून संरक्षण होते, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. त्यामुळे ही मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. कोरोना लसीमुळे कोविड 19 विषाणूपासून लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मिळते. त्यामुळे जगभरातील प्रत्येक देशातील सरकार नागरिकांचे लसीकरण करण्यावर अधिक भर देत आहे.
सर्वांनी लसीकरण करण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचं आवाहन
जागतिक आरोग्य संघटनेनं लसीकरणाचे फायदे सांगितले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीमुळे कोरोनासह इतर 21 आजारांपासून संरक्षण मिळते, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
लस घेतल्यामुळे संरक्षण होणाऱ्या वीसहून अधिक आजारांची यादी व्हॅक्सिन वर्क या हॅशटॅगसह जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केली आहे. त्यामुळे लस घेण्यास घाबरु नका, कोणतेही गैरसमज बाळगू नका आणि लवकरात लवकर लसीकरण करावे, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.
कोरोनामुळे ‘या’ 21 आजारांपासून होते संरक्षण
कोरोना प्रतिबंधक लसीमुळे 21 आजारांपासून संरक्षण होते. लसीमुळे हेपॅटायटस बी , गोवर, कांजण्या, रुबेला, गर्भाशयाचा कर्करोग, पटकी/कॉलरा, घटसर्प, इबोला, इन्फ्लुएंझा, जपानी एन्सेफलायटीस, मेंदुज्वर, गालगुंड, डांग्या खोकला, फुफ्फुसाचा दाह/न्यूमोनिया, पोलिओ, रेबिज, रोटा व्हायरस, धनुर्वात, विषमज्वर, पीतज्वर या रोगांपासून संरक्षण होते.