गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून देण्याच्या आमिषाने 1 लाख 37 हजार रुपयांची फसवणूक

क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवून देण्याचे आमिष दाखवून क्रेडिट कार्डशी संबंधित असणारी सर्व माहिती फोनवरून घेऊन एका व्यक्तीची तब्बल 1 लाख 37 हजार रुपयांनी आर्थिक फसवणूक करण्यात आली. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. रत्नाकर सुभाष कोकीळ (वय 45) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या कडे एका खाजगी कंपनीचे क्रेडिट कार्ड आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला आणि त्याने कंपनीच्या क्रेडिट कार्ड डिपार्टमेंट मधून बोलत असल्याचे सांगितले.

क्रेडिट कार्डचे एक्टिवेशन, जुन्या कार्डची लिमिट वाढवणे आणि जुन्या कार्डवरील रिवॉर्ड पॉइंट वापरण्यास मिळवून देतो असे सांगून समोरील व्यक्तीने त्यांच्या क्रेडिट कार्ड ची सर्व माहिती घेतली.

त्यानंतर कंपनीतून केलेल्या प्रोसेसचा कोड नंबर देत असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यांच्या मोबाईलवर आलेले सर्व मेसेज मधील कोड नंबर विचारून घेतले. आणि त्यांच्या क्रेडिट कार्ड मधील 1 लाख 37 हजार 238 रुपयांचा अपहार केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *