

घेरडी तालुका सांगोला येथील रहिवाशी रावसाहेब गणपती बुरुंगले वय- 62 हे सार्वजनिक बांधकाम खात्यात मैलमजूर म्हणून सेवा बजावून निवृत्त झाले आहेत.दि.29/10/2021रोजी मी माझे पेंन्शनचे कामासाठी ते बांधकाम विभाग पंढरपुर येथे आले होते.
दुपारी 02/00चे सुमारास ते येथील आपले काम उरकून टाकळीकडे जाणारे रोडलगत, राधेश हाँटेलचे जवळ ,पाठीमागुन तोंडाला चित्याचा रुमाल बांधलेला ,पांढरा शर्ट व खाकी पँट असा पेहराव केलेला व त्याचे ड्रेसवरुन तो पोलीस असावा असे वाटत असलेल्या एका इसमाने फिर्यादी रावसाहेब बुरुंगले यांच्या मोटार सायकलच्या पुढे त्याची मोटार सायकल उभी करत मी एक पोलीस अधिकारी आहे,तुमच्या अंगावर काय दागिने आहेत,आणि मोटार सायकलच्या डिकित काय आहे ते मला दाखवा असे सांगितल्याने फिर्यादीने सदर व्यक्ती पोलीस असल्याचे समजून त्यास मोटार सायकलची डिकी उघडून त्यात असलेले एक जर्किन व बागायतदार पंचा त्याला दाखविला,त्यावेळी सदर तोतया पोलिसाने सोन चोरणा-या लेडीज-बाया आल्या आहेत ,तुम्ही अस दागिने अंगावर घालुन जावु नका असे सांगत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन,सोन्याची अंगठी,पाकीट,मोबाईल त्या पंचात गाठ मारून ठेवले.व तेथून पसार झाला.
पुढे काही अंतर गेल्यानंतर फिर्यादीस संशय आल्याने त्यांनी बागायतदार पंचाच्या गाठी सोडुन बघितले असता मला त्यात माझा मोबाईल ,पाकीट मिळुन आले परंतु त्यात सोन्याची चैन,अंगठी मिळुन आली नाही.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.