Uncategorized

फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये वाजू लागली शिक्षणाची घंटा

सांगोला:फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित,  फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षणाच्या घंटेचा आवाज पुन्हा एकदा ऐकू येऊ लागला. जागतिक कोरोना संकटामुळे सगळे जग स्तब्ध झाले होते. पण 4 ऑक्टोबर पासून इयत्ता आठवी ते बारावी शाळा   (कनिष्ठ महाविद्यालये)  पुन्हा सुरू झाली आहेत.  सरकारच्या नियमांचे पालन करीत पुन्हा एकदा शाळेच्या प्रांगणामध्ये प्रार्थनांचे  स्वर ऐकू येऊ लागले. शाळेमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सर्व शाळा सॅनिटायझर करून  सजवण्यात आली.

विद्यार्थ्याना प्रथम  सॅनिटायझर करून त्यांचे  तापमान चेक करण्यात आले. विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प देण्यात आले. सर्व विद्यार्थी आणि पालकांनी उत्साहात शाळेमध्ये हजेरी लावली व शाळेने राबवलेल्या   कोरोनाच्या नियमांचे कौतुक पालकांनी केले. संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. भाऊसाहेब रूपनर यांच्या मार्गदर्शनाखाली व  कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे,  प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांच्या उपस्थित शाळा  सुरू झाली. यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *