ताज्याघडामोडी

पतीचे कोरोनामुळे निधन,पत्नीकडून विम्याचे १ कोटी रुपये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस दान

दिनाचा सोयरा पांडुरंग म्हणून संतांनी ज्या विठ्ठलाचा आपल्या अभंगातून उल्लेख केला आहे.पण या सावळ्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी आता संपूर्ण महाराष्ट्राला शतकानुशतके लागून राहिली आहे.आधी प्रपंच करावा नेटका असे संत तुकोबारायांनी आपल्या अभंगातून सांगितले आणि आपला प्रपंच करत असताना विठ्ठलाच्या नमस्कारणाची महतीही वर्णन केली आहे.भाविक आपल्या कुटूंबाच्या पालन पोषणासाठी राबत असताना आपण जे कमवतो त्यातील काही भाग सत्पात्री दान करावे याची शिकवण विसरले नाहीत आणि अशाच एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या विठ्ठल भक्तास कोरोनाची लागण झाली.त्या भक्ताने आपला एक कोटी रुपयांचा जीवन विमा उतरवला होता.मात्र जेव्हा मृत्यू डोळ्यासमोर दिसू लागला तेव्हा त्या भक्ताने आपल्या पत्नीस माझ्या विम्याच्या रकमेतील १ कोटी रुपये पंढरीच्या पांडुरंगास अर्पण करण्याची इच्छा प्रकट केली.त्या भाविकाचे कोरोनामुळे निधन झाले मात्र त्याच्या पत्नीने विमा रकमेपोटी मिळालेले १ कोटी रुपये चेकद्वारे श्री विठ्लाच्या चरणी देणगी स्वरूपात देऊन आपल्या पतीची इच्छा पूर्ण केली आहे.तर इतकी मोठी देणगी देऊनही आपले नाव गुप्त ठेवावे अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.सदर महिला भक्त ही मुंबई येथील असल्याचे समजते. 
        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *