ताज्याघडामोडी

आजपासून सातबारा नव्या रुपात, बहुतांश महसूल सेवा मिळणार ऑनलाईन

राज्यात सध्या सातबारा ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करण्यात आला असून तो वेगळ्या स्वरूपात असल्याची माहिती त्यांनी दिली. सातबारा उताऱ्याचा फॉरमॅट बदलला असल्याचं थोरात म्हणाले. महसुली कागदपत्रांमध्ये काही फेरफार करायचे असतील, तर त्यासाठी अनेकांना सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागतात. मात्र आता फेरफार करण्याची ही सोयदेखील ऑनलाईन करण्यात आली असून नागरिकांचा त्रास वाचणार असल्याचं थोरातांनी सांगितलं आहे.

मिळकत पत्रिकासुद्धा आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.शेतकरी आता स्वतःच्या मोबाईलवरून पिकांचे फोटो काढून अपलोड करू शकतात. तलाठ्याने शेतावर जाण्याची गरज नसल्याचं थोरांतांनी म्हटलंय. कोरोना काळात स्टँप ड्युटी कमी केल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार वाढले आणि त्यामुळे महसूल वाढला, असं त्यांनी सांगितलं. मात्र महसुलातील ही सवलत पुन्हा देण्याचा सध्या तरी विचार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *