ताज्याघडामोडी

जूनच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल, तर बारावीचा दुसऱ्या आठवड्यात निकाल

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा तर शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.

अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. यंदा कोरोनाच्या दोन वर्षांच्या ब्रेकनंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा पार पडल्या आहेत. त्यामुळे हा निकाल विद्यार्थ्यांसाठी विशेष असणार आहे. लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाचा विद्यार्थ्यांनाही सर्वात मोठा फटका बसला आहे. अनेक दिवस विद्यार्थी शाळेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे आता हे नुकसान भरून काढण्याचं तसेच निकाल प्रक्रिया आणि पुढची प्रवेश प्रक्रिया वेगवान बनवण्यावर भर दिला जात आहे.

पेपर तपासणी अंतिम टप्प्यात पोहोचली

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीचं काम अंतिम टप्प्यात आलंय अशीही माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली त्यामुळे येत्या जूनमध्ये निकाल लागण्याची शक्यता आधीच वर्तविण्यात आली होती, आता त्यावर शिक्कामोर्तब झालंय. अंतिम टप्प्यात 30 तारखेपर्यंत पेपर तपासणीचं काम पुर्ण होणार आहे तसेच जूनच्या दुसऱ्या आठवड्यात बारावी आणि शेवटच्या आठवड्यात 10 वीचा निकाल लागणार आहे, असे आज शिक्षण मंत्र्यांकडूनच स्पष्ट करण्यात आलं आहे.

तर निकाल लागल्यानंतर विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी तयारी सुरु होते. निकाल न लागल्याने पुढील प्रवेश अडकतो त्यामुळे बोर्ड सध्या अलर्ट मोडवर आहे. निकालाशिवाय विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाचं नियोजन करता येत नाही, त्यामुळे ही प्रक्रिया वेगान होऊन निकाल लागणं गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *