गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अखेर वादग्रस्त पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे बडतर्फ

एपीआय सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्यानंतर त्यांचा साथीदार कॉन्स्टेबल विनायक शिंदे याला सोमवारी मुंबई पोलीस सेवेतून डच्चू मिळाला. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने अटक केल्यानंतर सध्या तुरुगांत असलेल्या विनायक शिंदे याला सोमवारी पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले. वादग्रस्त कॉन्स्टेबल विनायक शिंदे याला यापूर्वी लखनभय्या हत्येप्रकरणात अटक झाली होती. त्या प्रकरणात शिक्षा लागल्यानंतर तो कारागृहात होता. त्यावेळेस शिंदेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान गेल्या वर्षी शिंदेला पॅरोलवर बाहेर सोडण्यात आले होते. पॅरोलवर आल्यानंतर विनायक शिंदे तत्कालीन सीआययूप्रमुख बडतर्फ एपीआय सचिन वाझे याला जाऊन भेटला आणि त्याच्याचसाठी काम करू लागला.

मनसुख हिरेनची हत्या करण्यात वाझेला शिंदेने साथ दिली. याबाबतचे पुरावे हाती लागल्यानंतर एनआयएने विनायक शिंदेला अटक केली. या कारवाईची गंभीर दखल घेत पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संविधानाच्या आर्टिकल 311 (2) (ब) नुसार विनायक शिंदे याच्यावर बडतर्फीची कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *