Uncategorized

भोसे माणिक मळा येथील शेतकऱ्याने केली द्राक्षाच्या बागेत गांजाची लागवड

शेतकरी हा साऱ्या जगाचा पोशिंदा समजला जातो.कोरोनाच्या संकटात भारतीय अर्थव्यवस्थेला बळ दिले ते केवळ शेतकऱ्यांनी.शेती हा निर्सगाच्या लहरीवर विसंबून असलेला रोजगार.आणि रोजगार हा शब्द प्रयोग करण्याचे प्रयोजन म्हणजे त्याने पिकवलेल्या मालाचा दरच तो ठरवू शकत नाही.पण तरीही काही शेतकरी शेतात राब राब राबून विक्रमी उत्पादन घेतात,बाजार पेठेच्या अभ्यास करून माल विक्रीस नेतात आणि मोठा आर्थिक नफाही कमवतात.मात्र काही शेतकऱ्यांना वेगळाच मार्ग अवलंबुन पैसा मिळवायचे स्वप्ने पडू लागतात आणि बेकादेशीर मार्गाचा वापर करून कायद्याच्या कचाट्यात अडकतात.करकंब पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार असाच प्रकार घडला असल्याचे निदर्शनास येत असून भोसे हद्दीतील माणिक मळा येथील द्राक्ष बागायतदार असलेल्या शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क गांजाची लागवड केली खरी पण सतर्क असलेल्या करकंब पोलिसांना याची माहिती मिळाली आणि त्या शेतकऱ्यास कारवाईस सामोरे जावे लागले आहे.   
         या बाबत करकंब पोलिसात दाखल फिर्यादी नुसार सपोनि रविंद्र मांजरे, 1) सफौ/बिराजी वामन पारेकर, 2) सफौ/ म.इसाक म.अबास मुजावर, 3) पोहेकाँ/517 नारायण रामचंद्र गोलेकर, 4) पोहेकाँ/ 387 धनाजी देविदास गाडे, 5) पोहेकाँ/ 853 मोहन शामकर्ण मनसावाले, 6) मपोहेकाँ/842 मोहिनी केशव भोगे, 7) चापोकाँ/ 533 समीर अहमद शेख हे जळोली चौकात आले असता त्यांना मिळालेल्या माहितीनुसार यशवंत जनार्दन घोडके, रा. माणिक मळा, भोसे ता. पंढरपूरयाने आपले शेती गट नंबर 568/3/अ च्या द्राक्ष बागायत शेतामध्ये गांजा सदृष्य वनस्पतीची लागवड केली असल्याचे समजले.सदर पोलीस कर्मचारी हे यशवंत जनार्दन घोडके याचे शेतात आले असता कच्च्या रोडपासून अंदाजे 20 ते 22 फूट अंतरावर द्राक्ष रोपास चिटकून गांजा सदृष्य वनस्पती दिसून आले.अंदाजे 6 फूट, 1 फूट उंचीचे गांजाचे झाड मुळासकट उपटून काढून त्याची छाटनी करून पाने व देठे त्याचे वजन केले असता त्याचे वजन 03 किलो 250 ग्रम इतके झाले. सदर शेतकरी यशवंत जनार्दन घोडके याचे विरूध्द गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(क), 20(ब) पप (ब) प्रमाणे करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *