ताज्याघडामोडी

सचोटी आणि प्रामाणिकपणा हीच यशाची गुरुकिल्ली- महादेव शिंदे

युटोपियन शुगर्स लि. येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

मंगळवेढा:- युटोपियन शुगर्स लि.पंतनगर कचरेवाडी येथे वार शनिवार  दि. १५ ऑगस्ट २०२० रोजी स्वतंत्र भारताचा ७४ स्वातंत्र्यदिन दि.पंढरपूर अर्बन बँकेच्या मंगळवेढा येथील शाखा प्रमुख श्री.महादेव शिंदे सो.यांच्या शुभ-हस्ते कारखाना कार्यस्थळावर ठीक सकाळी ८.०० वा. ध्वजारोहण उत्साहात व शिस्त-प्रिय वातावरणात करण्यात आला. यावेळी सकाळपासून देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती.कोरोंना च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाचे पालन करीत योग्य ती काळजी घेत सोशलडिस्टन्स ची अंमल बजावणी करण्यात आली.यावेळी युटोपियन शुगर्स चे सर्व अधिकारी,खाते-प्रमुख,उपस्थित होते.

        ध्वजारोहणाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले महादेव शिंदे यांनी सर्वांना “भारत माता की जय“म्हणत  स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की,सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्‍या युटोपियन शुगर्स ने आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर अल्पावधीतच आपले एक वेगळे नाव तयार केले असून एक आदर्श निर्माण केला आहे. ब्रिटिश साम्राज्यापासुन १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.  भारतासाठी हा सुवर्णक्षण आहे या दिवशी देशभरातही सर्व ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो तसेच येणाऱ्या पिढ्यांना स्वातंत्र्यासाठी आधीच्या पिढ्यांनी नेमकी काय किंमत मोजली याची जाणीव आपल्या भाषणात करून दिली.कोणत्याही उद्योगाची यशस्विता हि त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कामगाराच्या सचोटी वरच अवलंबून असून चालू गळीत हंगामात या गुणांवरच कारखान्याची विक्रमी कामगिरी करण्यात यावी असे मत व्यक्त करून कारखान्याचे चेअरमन उमेशराव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली कारखाना चालू गळीत हंगामामध्ये विक्रमी कामगीरी करेल आसा आशावाद हि शिंदे यांनी व्यक्त केला.

या वेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे,चीफ केमिस्ट दीपक देसाई ,चीफ इंजिनिअर पतंगराव पाटील,यांनी आपले मनोगत व्यक्त केले ,तर कार्यक्रमाचे आभार चीफ फायानांसियल ऑफिसर दिनेश खांडेकर यांनी मानले व चेअरमन साहेब यांच्या मार्गदर्शना खाली कारखाना विक्रमी कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेल अकौंटंट लक्ष्मण पांढरे यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *