ताज्याघडामोडी

आज दहावीचा निकाल लागणार?, स्वतः शालेय शिक्षण मंत्रालयानं दिली मोठी माहिती

 आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आज दहावीचा निकाल लागणार नाही आहे. शालेय शिक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. याआधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या आठवड्याच्या अखेरीस महाराष्ट्र एसएससीचा निकाल 2021 च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करेल, असं वृत्त समोर आलं होतं.

कालपासून सोशल मीडियावर आज दहावी निकाल लागणार असल्याची चर्चा सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्रालयानं यावर स्पष्टिकरण दिलं आहे.तसंच दहावी निकाल याबाबत पूर्व कल्पना याची माहिती अधिकृत कळवण्यात येईल, असंही शालेय शिक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.दहावीचा आणि बारावीचा निकाल जुलै महिन्यात लागणार असे संकेत राज्य शासनाकडून देण्यात आले होते. तसंच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही 15 जुलैपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होणार असं म्हटलं होतं.

निकालास होणार विलंब

कोरोनामुळे राज्यात एसएससी बोर्डाची परीक्षा 2021 रद्द करण्यात आली होती. यावर्षी निकालासाठी राज्य शिक्षण विभागानं मूल्यांकन असा पर्याय आणला आहे. समोर आलेल्या अन्य माहितीनुसार महाराष्ट्र एसएससी निकाल 2021 चे निकाल 23 जुलै 2021 पर्यंत जाहीर केले जातील. मात्र अद्याप अधिकृत तारखेची घोषणा झालेली नाही. काही वृत्तांत असं समोर आलं आहे की, दहावी आणि बारावीचे निकाल थोडे पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. एसएससीचा निकाल 23 जुलैपर्यंत अपेक्षित आहे, तर बारावीच्या निकालाही उशीर होणार असून 2 ऑगस्टपर्यंत जाहीर होईल.

असं होणार मूल्यांकन

यावर्षी राज्य शिक्षण विभागाने निकालाच्या गणितासाठी पर्यायी मूल्यांकन निकष लावले आहेत. महाराष्ट्र वर्ग दहावीच्या मूल्यांकन निकषानुसार, वर्ग 9 ची वार्षिक परीक्षा आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यांकन, युनिट टेस्ट आणि प्री-बोर्ड मधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे निकाल मोजण्यात येतील.

असा तपासता येईल तुमचा निकाल

अधिकृत महाराष्ट्र निकाल वेबसाइटला भेट द्या. maharashtraeducation.com

मुख्यपृष्ठावरील महाराष्ट्र इयत्ता 10 च्या निकालाच्या 2021 च्या लिंकवर क्लिक करा.

आपणास एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.

आपली क्रेडेन्शियल्स टाइप करा आणि लॉग इन करा.

आपला एसएससी निकाल आपल्या स्क्रीनवर दिसून येईल.

संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउट डाउनलोड करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *