ताज्याघडामोडी

राष्ट्रवादीचे दोन गट आमने सामने भिडले

पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आगामी निवडणुकीच्या  पार्शवभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन गट आमने सामने आले असून पालघर  जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा आणि निलेश सांबरे गटात मोठा मोठा राडा झाला असून यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला सदस्या मंदा घरट यांना दालनाबाहेर खेचून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली आहे.  

राष्ट्रवादीचा जो गट स्थापन करण्यासाठी आला त्याला सुनील भुसारा यांनी विरोध दर्शवला आणि जिल्हाधिकारी यांच्या दालनातच तुफान गराडा घातला. यावेळी पालघरमधील राष्ट्रवादीचे प्रतिष्ठित सुहास संख्ये यांच्याशीही सुनील भुसारा यांनी शाब्दिक बाचाबाची केल्याचे दिसले. या प्रकारामुळे गट स्थापन करायला आलेल्या सदस्यांना धोका असल्याने त्यांनी पोलीस सुरक्षा मागविली. त्यानंतर सर्व सदस्यांना पोलीस मोठ्या बंदोबस्तात सुरक्षित ठिकाणे घेऊन गेले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *