Uncategorized

सोलापूर जिल्ह्यातील खाद्य पदार्थ उत्पादक विक्रेते,रिपॅकर्स,रिलेबलर्स यांनी ३१ ऑगस्ट पर्यंत डि-1 परतावा दाखल करावा

 

सोलापूर जिल्हा व शहरातील सर्व उत्पादक, रिपॅकर, रिलेबलर्स यांना सुचित करण्यात येते की, 2020-21 या कालावधीतील डि-1 परतावा 31 मे 2021 पर्यंत भरण्याची मुदत होती. तथापि, सध्या Covid-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामध्ये लॉकडाऊन दरम्यान डि-1 परतावा जमा करण्यात आलेल्या अडचणी लक्षात घेता वार्षिक परतावा सादर करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2021 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नुसार सर्व उत्पादक, रिपॅकर, रिलेबलर्स आस्थापनांनी 01 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीचा वार्षिक परतावा फॉर्म डी 1 स्वरुपात भरुन ते या कार्यालयाच्या ईमेलवर ([email protected]) अथवा प्रत्यक्ष/पोस्टाव्दारे 31 ऑगस्ट 2021 पर्यंत पाठविण्यात यावे. तसेच मागील डि-1 परताव्याची पोच सोबत जोडावे.
तसेच उपरोक्त कालावधीतील डि-1 परतावा FOSCOS-https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर दाखल करणे बंधनकारक केले आहे यांची सर्व उत्पादकांनी नोंद घ्यावी.
सर्व अन्न उत्पादकांनी 2020-2021 या कालावधीचा डि-1 परतावा 31 ऑगस्ट 2021 पुर्वी सादर न केल्यास त्यांना 01 सप्टेंबर 2021 पासुन प्रत्येक दिवशी 100/- रुपये प्रमाणे विलंब शुल्क आकारण्यात येईल.
ज्या अन्न पदार्थ उत्पादक, रिपॅकर, रिलेबलर्स, आयात/निर्यातदार उत्पादक आस्थापनेकडून परतावा सादर केल्याचे दिसुन न आल्यास त्यांचेविरुध्द अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कलम 58 नुसार मा. न्यायनिर्णय अधिकारी तथा सह आयुक्त (अन्न), पुणे विभाग, पुणे यांच्याकडे न्यायनिर्णय प्रकरण प्रस्तावित करण्यात येईल याची सर्व अन्न पदार्थ उत्पादक, रिपॅकर, रिलेबलर्स यांनी नोंद घ्यावी. तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 मधील कलम 58 चा भंग केल्यास रुपये 2,00,000/- (2 लाख) पर्यंत दंड होऊ शकतो असे आव्हान अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, सोलापूरचे सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. प्रदिपकुमार राऊत यांनी केलेली आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *