गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

व्हिडिओ रेकॉर्ड करुन सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या

पिंपरी- चिंचवडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केली आहे. ताथवडे येथील राहत्या घरात त्यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे.आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओत काम करत असताना लेबर युनियनचा एक पदाधिकारी त्रास देत असल्याचं राम सापते यांनी सांगितलं आहे.

वाकड पोलीस स्टेशनमध्ये राम सापते यांच्या आत्महत्ये प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई झाली आहे.पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, यापुढे कलाकारांना त्रास दिल्यास हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, ही धमकीच आहे, असा इशाराच खोपकर यांनी दिला आहे.साप्तेंच्या निधनाच्या वृत्तानंतर मनसेनं तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनचिसेचे अमय खोपकर यांनी युनियनच्या नेत्यांना इशाराच दिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला चित्रपट किंवा मालिकेच्या सेटवर जाऊन चित्रीकरण बंद पाडता येऊ शकत नाही.तसेच, भविष्यात कोणताही निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांना युनियनच्या लोकांनी सेटवर जाऊन त्रास दिला तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, ही धमकीच समजा, असा थेट इशाराच खोपकर यांनी दिला आहे.

सिनेक्षेत्रातील प्रसिद्ध कलाकाराने व्हिडिओ पोस्ट करुन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. साप्ते यांनी आपल्या पुण्यातील घरात आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ तयार केला, त्यामध्ये आत्महत्येचे कारण सांगितल आहे. लेबर युनियमधील राकेश मौर्य यांच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे साप्ते यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *