ताज्याघडामोडी

वशिलाच्या लसीकरणाला विरोध करीत लसीकरण केंद्रावर नागिरकांचा राडा

राज्यात अनेक लसीकरण केंद्रावर वशिलेबाजी होत असल्याच्या तक्रारी वेळावेळी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.कोवीन पोर्टलवर नोंदणी करण्यास स्लॉटच उपलब्ध होत नाहीत त्यामुळे सामान्य नागिरक पुरते वैतागले आहेत.काही ठिकाणी आवश्यक कागदपत्रे घेऊन थेट लस घेण्यासाठी येण्यास परवानगी दिली आहे मात्र अशा ठिकाणीही वशिलेबाजी होताना दिसून येत आहे.नगर शहरात असाच प्रकार घडला असून भाजपाचा शहराराध्यक्ष आपल्या पदाचा दबाव टाकत खाजगी कंपनीतील लोकांना घेऊन लसीकरण केंद्रावर आल्याचे दिसताच नागिरकांचा राग अनावर झाला आणि त्यांनी भय्या गंधे यास चोप दिला आहे.  
     नगर शहरातील प्रोफेसर कॉलनी परिसरातील लसीकरण केंद्रावर लस देण्यासाठी भाजपच्या शहर अध्यक्ष गंधे याने बाहेरगावचे लोक आणले आहेत आणि वशिलेबाजी होत आहे हे लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांचा संताप अनावर झाला आणि हि घटना घडली आहे.एकीकडे सामान्य जनता लस घेण्यासाठी तासन्तास रांगेत थांबत असताना वशिलेबाजीचा प्रकार आढळून आल्यानंतर संताप व्यक्त होत आहे.
       पंढरपूर शहरातही सुरुवारतीच्या काळात लसीकरण केंद्रावर वशिलेबाजी होत आहे असे आरोप करण्यात येत होते.त्यानंतर नगर पालिका प्रशासनाने सुयोग्य नियोजन करत हा वाद संपुष्ठात आणला असला तरी शहरास अपुरा लस पुरवठा होत असल्याने मोठी नाराजी व्यक्त होत आहे.   

   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *