ताज्याघडामोडी

पंढरपूरच्या दिशेने निघालेले बंडातात्या कराडकरांचे आंदोलन स्थगित

 पंढरपूरच्या दिशेने पायी वारीसाठी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवले होते. मंगल कार्यालयाच्या बाहेर बंडातात्यांच्या समर्थकांनी गर्दी करण्यात सुरुवात केली. अनेक समर्थकांनी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. बंडातात्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ४ -५ तास त्यांच्या समर्थकांचे भजनी आंदोलन सुरु होते.पंढरपूरला पायी वारीसाठी निघालेल्या बंडातात्या कराडकरांचे आंदोलन स्थगित केले आहे. आंदोलन मागे घेण्याचा निरोप दिल्याची माहिती समर्थकांनी दिली आहे. शासनाचे निर्देश केवळ वारकऱ्यांनाच का? वारकऱ्यांची एकी नसल्याने सरकारचे ऐकावे लागते असे बंडातात्या कराडकर यांनी म्हटले आहे. वारकरी संप्रदायाच्या फुटीर वृत्तीमुळे तूर्तास आंदोलन मागे घेतल्याचे सांगितले. पहाटेपासूनच बंडातात्या यांच्या आवाहनानंतर टप्प्याने टप्प्याने वारकरी रस्त्यावर उतरले होते. त्याचप्रमाणे तिथले स्थानिक आमदार महेश लांडगे सुद्धा बंडातात्यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेले आदेश बंडातात्या यांना मान्य नसून ते अद्याप पायी वारीवर ठाम आहेत. पोलिसांनी जर नाटक केली तर आम्ही समूह घेऊन चालू एकटे चालणार नाही. कोरोना असेल तर आमच्या जबाबदाऱ्या आम्ही घेऊ आणि वारीला जाऊ, असे बंडातात्या यांनी म्हटले आहे.पंढरपूर आषाढी वारी रद्द केल्यानंतर वारकऱ्यांमध्ये एकच आक्रोश पहायला मिळाला. केवळ वाखरीपासून दीड किलोमीटरपर्यंत पायी वारी काढली जाणार असून सर्वसामान्यांना त्यात प्रवेश नाही. केवळ मानाच्या पालख्या पंढरपूरात दाखल होणार आहेत. सरकारच्या या निर्बंधांचा निषेध करत बंडातात्या शुक्रवारी आळंदी येथे दाखल झाले व त्यांनी आळंदीहून पायी वारीला सुरुवात केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *