आमदार म्हणजे सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारा नेता अशी प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते.मात्र काही लोकप्रतिनिधींना अनेक निरनिराळे छंद असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे,मात्र उंच लोक उंची पसंद असा समज जोपासत अनेक वेळा सामान्य जनता अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करते.पण कधीमधी असा एखादा लोकप्रतिनिधी असे काही कृत्य करताना रंगेहाथ सापडतो आणि याची चर्चा राज्यभरात होताना दिसून येते.
सध्या गुजरातमध्ये भाजपचे आमदार केसरीसिंग सोलंकी आणि इतर 25 जणांना जुगार आणि मद्यपान केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाची खुमासदार चर्चा गुजरातमध्ये होत आहे.जुगार खेळत असताना आणि दारू बाळगल्या प्रकरणी पंचमहाल जिल्हा पोलिसांनी हि कारवाई केली आहे.
गुरुवारी रात्री पंचमहाल जिल्ह्यातील एका आलिशान रिसॉर्टवर छापा टाकण्यात आला असता हा प्रकार उघडकीस आला आहे.सोलंकी आणि इतर 25 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दारूच्या बाटल्याही जप्त केल्या. पुढील तपास सुरू आहे.
