

चोरी,दरोडा आदी घटनांमध्ये चोरीस गेलेला सोन्या-चांदीचा ऐवज तसेच इतर मुद्देमाल हा बऱ्याचदा न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करण्यात येत असल्याने अथवा मालकी संबंधित योग्य पुरावे सादर करण्यास अड़चनी आल्याने पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल विभागाकडे कुलूपबंद कपाटात पडून असतो.व हा मुद्देमाल सांभाळण्यासाठी विशेष कर्मचाऱ्याची नियुक्तीही करण्यात आलेली असते.अनेक किमती चीजवस्तू अनेक महिने पडून असल्याचेही आढळून येते.दुलर्क्षित असल्याचे दिसून येते.आणि याचीच संधी साधत नगर पोलीस ठाण्यात घडला असून थेट जप्त केलेले सोन्याचे दागिने फायनान्समध्ये गहाण टाकत ४ लाख ४० हजार रुपये कर्ज काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी गणेश शिंदे या पोलिसावर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच संबंधित आरोपी याने अजून काही रक्कमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.