ताज्याघडामोडी

सिद्धेवाडी नजीक एफआरपी साठी एसटीवर दगडफेक केल्याचा आरोप

पंढरपूर तालुक्यातील ९ जणांची निर्दोष मुक्तता 

साखर कारखान्याकडील एफआरपी जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २०१३ मध्ये केलेल्या आंदोलनावेळी पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथे एसटी बसवर दगडफेक केल्याची घटना घडली होती.या घटनेनंतर पंढरपूर तालुका पोलिसांकडून सिद्धेवाडी येथील ९ तरुण शेतकऱ्यांवर भादविक ३४९, १४३, १४७, १४८, १४९, ४२७, ३३६ क्रिमिनल लॉ अमेंडमेड अॅक्ट १९३२ कलम ७ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या खटल्याचा निकाल बुधवार दिनांक २८ रोजी लागला असून मे.न्यायाधीशांनी या नऊही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.या खटल्यात आरोपींच्या वतीने ऍडव्होकेट विजयकुमार नागटिळक यांनी बाजू मांडली.
सदर खटल्यात १) विशाल अरविंद जाधव २) तानाजी प्रकाश जाधव ३) विकास रामचंद्र जाधव ४) विजय मुरलीधर जाधव ५) ज्योतिर्लिंग गोपाळ काटकर ६) प्रकाश विठ्ठल जाधव ७) बब्रुवान कबीर जाधव ८) गोरख नागनाथ जाधव १) अमोल मारुती जाधव सर्व राहणार सिध्देवाडी ता. पंढरपूर येथील शेतकरी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *