ताज्याघडामोडी

1 जुलैपासून या बँका बदलत आहेत महत्त्वाचे नियम, तुमच्यावर होणार थेट परिणाम

नवी दिल्ली, 29 जून: नवीन महिन्यामध्ये काही महत्त्वाच्या आर्थिक नियमात बदल होणार आहे. 1 जुलै 2021 पासून बँकांच्या नियमात होणाऱ्या बदलामुळे तुमच्या जीवनावर थेट परिणाम होणार आहे. यामध्ये देशभरातील काही महत्त्वाच्या बँकांचा समावेश आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक, सिंडिकेट बँक इ. यांसारख्या बँकांचे नियम बदलणार आहेत. एटीएम कॅश विड्रॉल, चेक स्लीप इ. मध्ये काही बदल तुम्हाला पाहायला मिळतील. जाणून घ्या काय आहेत हे महत्त्वाचे बदल

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाचे बदल

कॅश विड्रॉलवर शुल्क- एसबीआय बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खातेधारकांना दरमहा चार वेळा मोफत पैसे काढता येतील.ज्यात एटीएम आणि बँक शाखांचा समावेश आहे. मोफत मर्यादेनंतर बँक प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये अधिक जीएसटी घेईल. पैसे काढण्यावर शुल्क होम ब्रँच, एटीएम आणि गैर एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यावर लागू होईल.

SBI चेकबुक शुल्क- -SBI BSBD खातेधारकांना एका फायनान्शिअल इयरमध्ये 10 चेकची कॉपी मिळते. आता 10 चेकच्या चेकबुकवर चार्जेस द्यावे लागतील. 10 चेकच्या पानांसाठी बँक 40 रुपये आणि जीएसटी शुल्क आकारेल. 25 चेक लीवसाठी बँक 75 रुपये आणि जीएसटी चार्ज करेल. इमर्जन्सी चेकबुकवर 10 पानांसाठी 50 रुपये अधिक जीएसटी द्यावा लागेल. ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकवर नवीन सेवा शुल्कातून सूट दिली जाईल

Axis बँकेच्या ग्राहकांसाठी असतील हे बदल

देशातील खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या अॅक्सिस बँकेने एसएमएस अलर्ट शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दर महिन्याला निश्चित 5 रुपये शुल्क घेण्याऐवजी बँक आता प्रत्येक एसएमएस अलर्ट  साठी 25 पैसे (महिन्यातून जास्तीत जास्त 25 रुपये) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रमोशनल टेक्स्ट किंवा ओटीपी मेसेजसाठी हे शुल्क लागू असणार नाही.

सिंडिकेट बँकेच्या शाखांचा IFSC कोड बदलणार

सिंडिकेट बँकेचं 1 एप्रिल 2020 पासून कॅनरा बँकेत (Canara Bank) विलीनीकरण झालं आहे. त्यामुळे आता 1 जुलैपासून बँकेचा IFSC कोड बदलणार आहे. सिंडिकेट बँकेचा सध्याचा IFSC कोड 30 जून 2021 पर्यंतच सुरू राहील. त्यानंतर 1 जुलै 2021 पासून बँकेचा नवा IFSC कोड लागू होईल. सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना आता नवा IFSC कोड घ्यावा लागेल. तसंच जुनं चेकबुकही वापरता येणार नाही. एनईएफटी/ आरटीजीएस/ आयएमपीएस मधून फंड ट्रान्सफर करण्यासाठी या ग्राहकांना कॅनरा बँकेच्या आयएफएससी कोडचा वापर करावा लागेल.

सिंडिकेट बँकेचे ग्राहक IFSC आणि MICR कोडबाबत माहितीसाठी कॅनरा बँकेच्या http://www.canarabank.com/ वेबसाईटवर माहिती घेऊ शकतात. इथे ‘What’s New’ वर क्लिक करुन ‘KIND ATTN eSYNDIATE CUSTOMERS: KNOW YOUR NEW IFSC’ वर क्लिक करा. त्याशिवाय ग्राहक 18004250018 या क्रमांकावरही संपर्क करू शकतात.

या दोन बँकांच्या खातेधारकांना मिळेल नवीन चेकबुक

आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण झालं आहे. अशावेळी यूनियन बँकेने दोन्ही बँकांच्या ग्राहकांना नवीन चेकबुक घेण्यास सांगितलं आहे, तुमचं आधीच चेकबुक आता अवैध असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *