ताज्याघडामोडी

गाळप परवान्याबाबत सहकार शिरोमणी कारखान्याचा खुलासा

चेअरमन कल्याणराव काळे यांनी दिली माहिती

भाळवणी :- मागील दोन-तीन दिवसापासून दै.वर्तमानपत्रामध्ये कारखान्याने गोपिनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याणकारी महामंडळ योजना निधी न भरल्याने गाळप परवाना मिळाला नाही. याबाबत कारखान्याचे वतीने खुलासा करीत आहोत.

आमचे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि, चंद्रभागानगर, भाळवणी, ता.पंढरपूर, जि.सोलापूर या संस्थेने महाराष्ट्र शासनाने दि.28 जुलै 2022 रोजी जारी केलेल्या परिपत्रकाप्रमाणे विहित नमुन्यात सन 2022-23 या गळीत हंगामातील ऑनलाईन परवाना मिळणेकामी दि.15/09/2022 रोजी रितसर प्रस्ताव दाखल करुन त्याची हार्डकॉपी मा.प्रादेशिक सहसंचालकसो (साखर), सोलापूर विभाग सोलापूर यांचेकडे दि.16/09/2022 रोजी व मा.साखर आयुक्तसो, महाराष्ट्र राज्य्‍, पुणे यांचेकडे दि.23/09/2022 रोजी दाखल करण्यात आलेली आहे. शासनाचे परिपत्रकातील सर्व अटी व शर्तीची पुर्तता करुन रितसर ऑनलाईन व ऑफ लाईन प्रस्ताव दाखल केलेला आहे.

शासनाचे परिपत्रकातील अटी व शर्तीनुसार ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे मागील सर्व ऊस बिले अदा करणत आली असून, सन 2021-22 मधील मुख्यमंत्री सहाय्यता निधी, साखर संकुल निधी, गोपिनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याणकारी महामंडळ योजना निधी इ. निधीच्या रक्कमा नियमाप्रमाणे वेळेत जमा केलेल्या आहेत . 

शासनाने यापुर्वी राज्यातील सर्व साखर कारखाने 15 ऑक्टोंबर, 2022 पासुन सुरु करण्याचा अद्यादेश काढला असताना महाराष्ट्रात ठिक-ठिकाणी अतीवृष्टी झाल्यामुळे बहुतांश कारखाने 01 नोव्हेंबर पासून सुरु झाले आहेत. आमचे कारखान्याकडे बीड,नगर व इतर भागातुन ऊस तोडणी मजुर हे कारखाना साईटवर हजर झाले आहेत. दै.वर्तमान पत्रातील बातमीमुळे कारखान्यार हजर झालेली ऊस तोडणी वाहतुकीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कारखान्याचे फार मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. तरी कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस पुरवठादार शेतकरी सभासदांनी अशा बातम्यावर विश्वास ठेवु नये असे आवाहन चेअरमन कल्याणराव काळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *