

पंढपुरात आळंदी येथील व्यक्तीस चाकूचा धाक दाखवून मोबाईल व १३ हजार रोख रक्कम आणि पॅनकार्ड लंपास केले आहे.या बाबत आळंदी तालुका खेड येथील रहिवाशी श्रीमंत मल्लीकार्जुन म्हेत्रे, वय 35 वर्षे, धंदा नोकरी यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार श्रीमंत मल्लीकार्जुन म्हेत्रे हे टाटा मोटर्स कारप्लान्ट, चिखली, पुणे या कंपनीत ऑपरेटर म्हणुन नोकरीस आहेत. ते मुळचे नंदूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर असुन येथील असून त्या ठिकाणी पत्नी व मुलगी यांना नेण्यासाठी दि. 26/06/2021 रोजी सायं. 07/00 वा टाटा इंडिका व्हिस्टा रजि. क्र. एम. एच. 14 डीए 6052 हे वाहन घेऊन निघाले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास ते चंद्रभागा नदीवरील अहिल्या पूल ओलांडून पुढे आले असता एका मोटार सायकल वरून दोन इसम येऊन त्यांनी इंडिका गाडीच्या आडवी दुचाकी लावून कारचा दरवाजा जबरदस्तीने उघडला.चाकुचा धाक दाखवुन शर्टाच्या खिशातील समसंग कंपनीचा मोबाईल काढुन घेतला व त्यानेच माझे शर्ट पँट चे खिसे तपासले.त्यानंतर दुसऱ्याने (वर्णन- वय 35 ते 40 वर्षे, बुटका, बांधा मजबुत, डाव्या कानास भजा असलेला ) कारचा दरवाजा उघडुन त्यातील जाभळ्या रंगाची बग त्यातील साहित्यासह रोख रु. 13,000/-, पनकार्ड घेतले व घडला प्रकार कोणाला सांगितल्यास पाहुन घेवु अशी धमकी देवुन मोटारसायकल वरुन निघुन गेले. या प्रकरणी २ अज्ञात इसमा विरोधात भादंवि कलम ३४,३४१,३९२,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.