गेल्या तीन महिण्याच्या कालावधीत पंढरपुर शहर व लगतच्या उपनगरातून मोटार सायकल चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून फिर्याद दाखल करूनही सदर चोरीस गेलेल्या मोटार सायकल परत मिळण्यास एकतर फार मोठा कालावधी जातो अथवा कधी चोरीचा तपसाच लागत नाही असा प्रकार घडत असल्यामुळे शहरातील मोटार सायकल मालक मात्र चिंतेत असल्याचे दिसून येते.
दिनांक २७ जून रोजी पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात अंनत कटप यांनी दाखल फिर्यादीनुसार २१ जून रोजी सायंकाळी ५ ते ८:३० या कालावधीत त्यांनी आपली होंडा युनिकॉर्न कंपनीची मोटारसायकल क्रमांक MH 13 CX 6429 हि महावीर नगर येथील गांधी टेलिकॉम अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. सदर चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध असल्याचे समजते.
विठ्ठल हॉस्पिटल परिसरातून होंडा शाईनचीही चोरी
विठ्ठल हॉस्पिटल पाठीमागील बाजूस राहणारे रहिवाशी धनराज बाऴु शेरीकर यांच्या मालकीची नं MH10CK4519 ही दुचाकी होंडा शाईन हि दिनांक 19/06/2021 रोजी राञौ 09/30 वा चे सुमारास घरासमोर हँण्डल लाँक करुन लावण्यात आली होती.दि 20/06/2021रोजी सकाऴी 07/00वा चे सुमारास मोटारसायकल पाहिली असता मोटारसायकल लावलेल्या ठिकाणी दिसून आली.या बाबत त्यांनीही पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.